सांगवी, दि. २७ (punetoday9news):- पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी येथे भारतीय संविधान दिनानिमित्त भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन तसेच २६ नोव्हेंबर रोजी मुंबई शहरावर झालेल्या दहशतवादी हल्यात मृत्युमुखी पडलेल्या सर्व सामान्य नागरीक, शहीद झालेल्या पोलिस बांधव व जवान यांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमास नगरसेवक संतोष कांबळे, सुर्यकांत वराडकर, कांता कांबळे, सुधीर शिंदे, अमित बाराथे, निमिश कांबळे उपस्थित होते.
याावेळी फिनिक्स सोशल ऑर्गनायझेशनचे खजिनदार राहुल विधाटे यांनी संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन केले. त्यानंतर भारतीय संविधानाविषयी विस्तृत माहिती बामसेफचे जेष्ठ कार्यकर्ते दयानंद चव्हाण यांनी उपस्थित असलेल्या जनसमुदायास दिली.
कार्यक्रमाची प्रस्तावना फिनिक्स सोशल ऑर्गनायझेशनचे कार्याध्यक्ष योगेश कांबळे यांनी केली तर ॲड. वसंत कांबळे यांनी आभार मानले.
Advt:-
Comments are closed