पिंपरी,दि.२७(punetoday9news): अखिल भारतीय श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज मध्यवर्ती संस्थेच्या युवती अध्यक्षा किर्ती कापडणेकर व समस्त युवती संघटने तर्फे श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या ७५० व्या जयंती निमित्त सुगम भावगीत, भजन ,अभंग व महाराजांच्या जीवनावर आधारित लघुकथा यांचा ऑनलाईन कार्यक्रम अ.भा. शिंपी समाज राष्ट्रीय अध्यक्ष रविंद्र बागुल , महिला आघाडी अध्यक्षा वंदना जगताप , युवक अध्यक्ष प्रमोद शिंपी, माननीय विश्वस्त पदाधिकारी, कार्यकारी अधिकारी सर्व शिंपी समाज बंधू आणि भगीनी यांच्या उपस्थितीत ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आला.
या वेळी श्री संत शिरोमणी नामदेव महाराज प्रतिमा पुजन, गणेश वंदन व उपस्थित मंडळीचे स्वागत करण्यात आले. सुरेल अशा भावगीत, भक्तीगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या सुरवातीस शिंपी समाज राष्ट्रीय अध्यक्ष रविंद्र बागुल यांनी सर्व समाजबांधवांना श्री नामदेव महाराज जयंतीच्या शुभेच्छा दिल्या व समाज बंधुंशी चर्चा केली. त्यानंतर महिला अध्यक्षा वंदना जगताप यांनी महिला, युवती व सर्व समाज बांधवांना संबोधित केले. त्यांनतर राष्ट्रीय युवती अध्यक्षा किर्ती कापडणेकर यांनी युवतींनी जास्तीत जास्त संख्येने सामाजिक कार्यात सक्रिय व्हावे असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन, प्रभा बागुल, सुरुची ब्रम्हे व कांदबरी जाधव यांनी केले. मोनाली खैरनार यांनी आभार मानले.
Advt:-
Comments are closed