पुणे, दि. २७(punetoday9news):-

देशाची आर्थिक राजधानी मुंबईवर करण्यात आलेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याच्या बाराव्या स्मृतिदिनानिमित्त गुरुवारी सायंकाळी खडकी रेंजहिल्स अँम्युनेशन फॅक्टरी वसाहत येथे छावा मराठा संघटनेच्या वतीने एका कार्यक्रमाचे आयोजन करून 26/11 हल्ल्यातील शहिदांना मेणबत्त्या पेटवून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या वेळी अनेकांच्या डोळ्यांत शहिदांच्या आठवणीने पाणी तराळले होते.

26 नोव्हेंबर 2008 रोजी 10 पाकिस्तानी दहशतवाद्यांनी समुद्रमार्गे प्रवेश करत मायानगरी मुंबईला टार्गेट केले होते. या हल्ल्यामध्ये 34 विदेशी नागरिकांसह 166 जणांना आपला प्राण गमवावा लागला, तर सुमारे 700 जण जखमी झाले. प्राणाची पर्वा न करता लढलेल्या पोलीस जवानांनी 9 दहशतवाद्यांना कंठस्नान घालत, अतिरेकी अजमल कसाब याला जिवंत पकडले. यात 18 पोलीस जवानांना वीरमरण आले. या हल्ल्याला गुरुवारी बारा वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने खडकी येथे आयोजित श्रद्धांजली कार्यक्रमात छावा मराठा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह चिमुकलेही सहभागी झाले होते. मेणबत्त्या प्रज्वलित करून शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.




यावेळी छावा मराठा संघटनेचे पुणे जिल्हाप्रमुख रामभाऊ जाधव, राजू सदलापुरकर, संजय साळवे, अनिल जाधव, सुनिल सावंत, माजी नगरसेवक सुनिल जाधव, निलेश शेवाळे, बसपाचे पुणे शहर संघटक प्रभाकर खरात, गणेश सोनवणे, दिलीप भालेराव, अन्वर शेख आदींनी मेणबत्त्या प्रज्वलित करून शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली.

Comments are closed

error: Content is protected !!