पिंपरी,दि.२७(punetoday9news):- मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेले पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना पिंपरी चिंचवड पोलीस मित्र संघटना यांच्या वतीने गुरुवार सायंकाळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
थेरगाव येथील शहाजी भोसले यांच्या पोलीस मित्र संघटनेच्या संपर्क कार्यालय समोर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सहायक पोलीस आयुक्त राजाराम पाटील, विधी अधिकारी ॲड. प्रसाद सांगळे, चिंचवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर काटे, वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संतोष पाटील, सहायक पोलीस निरीक्षक अविनाश पवार, पोलीस उपनिरीक्षक रविंद्र मुदळ, चिंचवड वाहतुक विभागाचे अधिकारी संजय जाधव, महाराष्ट्र पोलीस मित्र संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कपोते, तसेच पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत पोलीस ठाण्यातील अनेक पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी कार्यक्रमाला भेट देऊन हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
पिंपरी चिंचवड पोलीस मित्र संघटनेचे सह सचिव शहाजी अकुंशराव भोसले यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले होते. शहरात कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेता सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन तसेच सॅनेटाइजचा वापर करुन हा कार्यक्रम संपन्न झाला .
पोलीस मित्र संघटनेचे संपर्क प्रमुख दत्ता दाखले, सदस्य वैभव बारणे, दानिश कुरेशी, पंकज गवळी, भाग्यश्री म्हस्के यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परीश्रम केले.
Advt:-
Comments are closed