26/11 shraddhanjali

 

सांगवी,दि २७ (punetoday9news):- पिंपरी चिंचवड मधील सांगवी पोलीस ठाणे येथे दहशतवाद्यांशी लढताना आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या वीरांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे, उपनिरीक्षक यशवंत साळुंके, गणेश माने, सहायक पोलिस फौजदर राम पवार, संजय भालेराव, शंकर जाधव, पोलीस हवालदार गिरीश राऊत, राजेश भिसे, पोलीस नाईक रोहिदास बोराडे, बापूसाहेब पोटे, नीता माने, पोलीस शिपाई प्राजक्ता चौगुले, संजय गांधी निराधार योजना सदस्य संजय मराठे व नागरिक उपस्थित होते.




या प्रसंगी वरिष्ठ पोलिस निरीक्षक रंगनाथ उंडे हे म्हणाले की २६/११ रोजी अतिरेकी यांच्या हल्याला चोखपणे प्रतिउत्तर देताना आपले काही पोलीस अधिकारी व कर्मचारी शहीद झाले, त्यांना श्रद्धांजली वाहुन आपण त्यांनी देश्यासाठी दिलेल्या बलिदानाचा आदर्श घ्यावा.

औंध मध्ये संविधानाच्या प्रस्ताविकेचे सामुदायिक वाचन करून संविधान दिन उत्साहात साजरा.





औंध डी.पी.रोड,डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला चतूर्शृंगी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शेवाळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून संविधान प्रस्ताविकेचे सामुदायिक वाचन करण्यात आले

Advt:-

 


#

Comments are closed

error: Content is protected !!