पुणे,दि.२७(punetoday9news):- आयकर विभागाने भोसले यांच्या घरावर पूर्वीही छापा टाकून भोसले यांच्या पुणे आणि मुंबईतील २३ ठिकाणांवर आयकर विभागाने धाडी मारल्या होत्या. आता पुन्हा एकदा ईडीने अचानक केलेल्या या चौकशीमुळे इतर बांधकाम व्यावसायिकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत .
प्राप्त माहितीनुसार ईडीने आज सकाळी अविनाश भोसले यांना मुंबईत बोलावून घेतले असून सकाळी १० वाजल्यापासून ते ईडीच्या कार्यालयात त्यांची चौकशी सुरू असून ते अजूनही ईडीच्या कार्यालयात आहेत . अचानक झालेल्या या चौकशीमुळे एकच खळबळ उडाली आहे. काल ईडीने पुण्यात काही ठिकाणी छापे मारले होते. त्यामुळे त्या संदर्भात भोसले यांना चौकशीसाठी बोलावले आहे का ? याबाबत ठोस माहिती समोर आली नाही .
Comments are closed