पुणे,दि.२८( punetoday9news ):- राष्ट्रवादीचे काँग्रेसचे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारत भालके यांचे करोनामुळे निधन झाले . त्यांचे वय ६० वर्षे इतके होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि तीन विवाहित मुली असा परिवार आहे. भालके यांच्या पार्थिवावर पंढरपुरातील सरकोली येथे शनिवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
त्यांना ३० ऑक्टोबर रोजी करोनाची लागण झाली होती. तेव्हा त्वरित उपचार घेत त्यांनी करोनावर मातही केली होती. मात्र, काहीच दिवसांत त्यांची तब्येत पुन्हा बिघडली . उपचारासाठी त्यांना पुण्यातील रूबी हॉल क्लिनिक येथे दाखल करण्यात आले . तिथे त्यांना दुसऱ्यांदा कोविड झाल्याचे निदान झाले . भालके यांना शुगर व रक्तदाबाचा त्रास असल्याने करोनाकाळात त्यांनी काळजी घ्यावी, असा कुटुंबीयांचा आग्रह होता. पण ते कायम रस्त्यावर उतरून जनतेची सेवा करत राहिले आणि संकट ओढवले. व अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Advt:-
Comments are closed