कोल्हापूर (punetoday9news):-  पुणे शिक्षक मतदार संघाची निवडणूक उद्या 1 डिसेंबर रोजी होत आहे. महा ठोका संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सर्जेराव रामचंद्र जाधव स्वतः निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून पूर्ण ताकदीने निवडणुकीला सामोरे जात आहेत. शिक्षकांच्या समस्या सोडवताना आलेले अनुभव, त्या माध्यमातून संपूर्ण मतदार संघाशी साधलेला संपर्क व त्यांनी केलेले भरीव कार्य या सर्जेराव जाधव यांच्या जमेच्या बाजू आहेत. त्यामुळे जाधव यांचे पारडे जड असल्याचे दिसत आहे.




सर्जेराव जाधव यांचा पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश शिक्षकांशी असलेला जिव्हाळ्याचा संबंध व ऋणानुबंध, त्यांची पुण्याई ही कामी येणार आहे. शिक्षकांच्या समस्या, अडचणी सोडविल्याने जाधव यांच्याबद्दल ऋण व्यक्त करण्याचीही भावना मतदारांत आहे. बहुतांश शिक्षकांनी एकमुखाने सर्जेराव जाधव यांना सक्रिय पाठिंबा दिला आहे. निवडणुकीत प्रथम क्रमांकाची सर्वाधिक मते मिळतील, अशी भावना व्यक्त केली आहे तसेच

शिक्षकांच्या अडचणी सोडवण्यात आपण वीस वर्षे खर्च केले आहेत, त्यामुळे सामान्य शिक्षक आपल्यालाच मतदान करतील, असा विश्वासही जाधव यांनी व्यक्त केला.





Comments are closed

error: Content is protected !!