आनंदवन, दि.३०( punetoday9news):- आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे यांचं निधन झाले असुन त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
चंद्रपूरचे पोलीस उपअधीक्षक निलेश पांडे यांनी म्हटलं आहे की “त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. ही आत्महत्या आहे की नक्की काय यावर भाष्य करता येणार नाही.”
शीतल आमटे त्यांच्या आनंदवन येथील घरी बेशुद्धावस्थेत सापडल्या. त्यांना चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले.
Comments are closed