पुणे, दि.१(punetoday9news) :- पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संघ निवडणूकीसाठी पुणे जिल्हयात शांततेत व सुरळीतपणे मतदानास सुरवात झाली. कोविड-१९ च्या अनुषंगाने सामाजिक अंतर, मास्क, सॅनिटायझर, वैद्यकीय सुविधा आदि आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली.

  • (दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअर व अन्य सुविधा प्रशासनाच्या वतीने उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. स्थळ- घोडेगाव, ता. आंबेगाव )

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जिल्हयात मतदान केंद्र परिसरात प्रशासनाच्यावतीने योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. सर्व मतदान केंद्रांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले असून मतदानासाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचा-यांना कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठीच्या साहित्याचे कीट पुरविण्यात आले आहे. मतदानासाठी येणा-या मतदारांमध्ये देखील सामाजिक अंतर राखण्याची दक्षता घेण्यात येत आहे. तसेच केंद्रावर येणा-या मतदारांची थर्मल स्कॅनरद्वारे तपासणी करण्यात येत आहे. मतदान केंद्रावर मतदार सहायक कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअर व सहायकाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. मतदान केंद्राबाहेर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे, असेही डॉ. देशमुख यांनी सांगितले.

(पुणे विभाग पदवीधर, शिक्षक मतदार संघ निवडणूक . कोविड-१९ च्या अनुषंगाने सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझर व अन्य खबरदारी घेऊन मतदानास सुरुवात. स्थळ: पिंपरी चिंचवड)

  • (पुणे विभाग पदवीधर, शिक्षक मतदार संघ निवडणूक.. कोविड-१९ च्या अनुषंगाने आवश्यक ती खबरदारी घेऊन मतदानास सुरुवात, स्थळ: बारामती)

 

  •  ( विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी आबासाहेब अत्रे इंग्रजी माध्यम शाळा, रास्ता पेठ, पुणे येथील मतदान केंद्राची पाहणी केली.)

 

Advt:-

 

 

 





Comments are closed

error: Content is protected !!