सातारा,दि.१(punetoday9news):- पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान झाले मात्र त्यामध्ये प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. पुणे पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष उमेद्वार अभिजीत बिचुकले यांचे नाव मतदार यादीतून गायब झाल्याने प्रशासनाच्या या भोंगळ कारभाराविरोधात अभिजीत बिचुकले यांनी संताप व्यक्त करत निवडणूक आयोगावर टीका केली आहे .
साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या मतदार केंद्रावर अभिजीत बिचुकले आपल्या पत्नीसह मतदान करण्यासाठी गेल्यावर मतदार यादीत नाव नसल्याचे समोर आले त्यामुळे बिचुकले यांनी चांगलाच संताप व्यक्त केला.
विशेष बाब म्हणजे बिचुकलेंच्या पत्नीचे नाव यादीत होते व पतीचे नाही असे कसे होते असा आरोप त्यांनी केला . त्यांनी मतदान केंद्रावरच गोंधळ घातला. मी स्वत: उमेदवार असून माझे नाव मतदार यादीत नाही.प प्रशासनाचा कारभार अश्या पद्धतीने असेल तर सामान्यांचे काय ? असा प्रश्न विचारत त्यांनी थेट निवडणूक आयोगावर टीका केली आहे.
Advt:-
Comments are closed