पुणे, दि. 4(punetoday9news):- पुणे विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार अरुण गणपती लाड विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी जाहीर केले.
अरुण लाड यांना 1 लाख 22 हजार 145 मते मिळाली. एकूण मतदान 2 लाख 47 हजार 687 इतके झाले त्यापैंकी 2 लाख 28 हजार 259 मते वैध तर 19 हजार 428 इतकी मते अवैध ठरली.
पुणे पदवीधर मतदारसंघासाठी 1 डिसेंबर रोजी मतदान झाले, निवडणूकीसाठी एकूण 62 उमेदवार निवडणूक लढवीत होते.
Advt:-
Comments are closed