निवडणुकांचा ट्रेंड बदलल्याची भावना व्यक्त.

 

सांगवी,४( punetoday9news):- पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी येेथे पुणे पदवीधर मतदारसंघात महा विकास आघाडीने दणदणीत विजय मिळवल्याबद्दल परिसरातील महाविकास आघाडीच्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी लाडू वाटप करून विजयोत्सव साजरा केला.

 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक चौकात कार्यकर्त्यांनी होळकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत फटाके वाजवून जल्लोष केला.

यावेळी बोलताना प्रशांत शितोळे म्हणाले, महाविकासआघाडीने पदवीधरांचे बेरोजगारांचे प्रश्न सोडवून काम करावे. याच बरोबर या विजयामुळे निवडणुकांचा ट्रेंड बदलला आहे. हे या विजयावरून सिद्ध झाले आहे.





यावेळी प्रशांत शितोळे, शिवाजी पाडुळे, पंकज कांबळे, सुनील ढोरे, उज्वला ढोरे, दीपक ढोरे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुदाम ढोरे, कुंदन कसबे, रोहित शेळके, सिकंदर पोंगडे, विजय साने, स्वरूपा खापेकर, चेतन शिंदे, ऋतुजा बिराजदार, गौरव चौधरी, वीरेंद्र गायकवाड, बाबा खराडे, रोहित शेळके, आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Advt:-

 

Comments are closed

error: Content is protected !!