पिंपरी,दि.५( punetoday9news) :- छावा मराठा संघटनेने पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीची घोषणा केली आहे. संघटनेच्या पुणे शहराध्यक्षपदी निवृत्त सैनिक अतुल निकम यांची; तर पिंपरी-चिंचवड शहाराध्यक्षपदी गणेश कोतवाल यांची नियुक्ती करण्यात आली. संघटनेचे पुणे जिल्हाप्रमुख रामभाऊ जाधव यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पदनियुक्ती पत्र देऊन जबाबदारी दिली.
सांगवी येथे आयोजित संघटनेच्या बैठकीत पुणे जिल्हाप्रमुख रामभाऊ जाधव यांनी पदनियुक्त्या दिल्या. यावेळी संघटनेचे राजू सदलापुरकर, गणेश सोनवणे, संजय साळवे, राजधन धुसिया, स्वप्नील नायर, दत्ताभाऊ धावडे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
संघटनेच्या पुणे शहर उपाध्यक्षपदी सचिन अहिर यांची, पिपरी-चिंचवड शहर उपाध्यक्षपदी किरण देवकर व पवनराजे काळभोर यांची, दापोडी विभाग अध्यक्षपदी संदीप नरबेकर यांची, तर अमर कुटे यांची वडगाव शेरी विभाग अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
यावेळी बोलताना निवृत्त सैनिक अतुल निकम म्हणाले, की समाजात काम करताना संघटनात्मक पाठबळाची आवश्यकता असते. त्याचवेळी निष्पक्षपणे काम करता आले पाहिजे. छावा मराठा संघटना ही राज्य, तसेच जिल्हा पातळीवर निष्पक्षपणे सामाजिक काम करणारी संघटना आहे. समाजातील तळागाळातील नागरिकांच्या समस्या, अडचणी सोडवून संघटना वाढीस प्रयत्नशील राहणार आहोत.
जिल्हाप्रमुख रामभाऊ जाधव यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले, छावा मराठा संघटनेचे राज्य पातळीवर मोठे काम चालते. जिल्हा स्तरावरही संघटना प्रभावीपणे काम करीत आहे. संघटनेच्या विस्ताराचा भाग म्हणून पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहर परिसरात पदाधिकारी नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. पदाधिकाऱ्यांनी कार्यक्षमपणे काम करून सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहनही जाधव यांनी केले.
Comments are closed