नाशिक,दि.६(punetoday9news):- प्रत्येक बहीण भावाला ओवाळताना म्हणते ईडा पीडा टळू दे अन बळीचं राज्य येऊ दे…पण आज पर्यंत शेतकऱ्याला नेहमी मातीत गाडण्याचं काम इथल्या व्यवस्थेनं केलं आहे.त्याच्या घामाला कधी योग्य दाम मिळाला नाही. त्याला कधी संघटीत होऊ दिलं नाही. त्याला जात, धर्म, पंथ यात गुरफटून फरपटत नेले आहे. त्याच्या असंघटित पणाचा फायदा मूठभर लोकांनी घेतला व स्वतःच्या तुंबड्या भरल्या.त्या लुटारूच्या मस्तकावर नेहमी राज्यकर्त्यांचा हात असतो.आज बड्या उद्योगपतींच्या घशात देशातला शेतकरी घालण्यासाठी केंद्राने शेतकरी विरोधी कृषी कायदे केलेत.

राजू शेट्टी साहेबांच्या नेतृत्वात 8 तारखेच्या भारत बंद मध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना ताकदीनं उतरणार आहे.राजू शेट्टी साहेबांनी आवाहन केल्यामुळे महाराष्ट्रात केवळ खेडे नाही तर शहरं व तेथील अनेक घटक 8 तारखेच्या बंदला पाठिंबा देणार आहे.मी नाशिक जिल्ह्यातील सर्व नागरिकांसह महाराष्ट्रातील जनतेला आवाहन करतो ..एक दिवस बळीराजाला द्या..बंद यशस्वी करा..!!
– संदीप जगताप
प्रदेशाध्यक्ष , स्वाभिमानी शेतकरी संघटना

केंद्र सरकारचा हा डाव शेतकऱ्यांच्या लक्षात आला. म्हणून दिल्लीच्या वेशीवर ऐतिहासिक शेतकरी आंदोलन करीत आहे.अद्भुतपूर्व एकजूट सगळ्या देशातल्या शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.मित्रांनो आपण प्रत्यक्ष दिल्लीत जाऊ शकत नसलो तरी या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आपण आपलं गाव, शहर स्वतःचं काम एक दिवस बंद ठेवा.रात्र अन दिवस कष्ट करून आपल्याला अन्न देणाऱ्या शेतकऱ्याने आपल्या कडे कधी ही काही मागितले नाही.लॉकडाऊन मध्ये सुद्धा त्याने जीव धोक्यात घालून तुमच्या साठी घरपोच भाजीपाला , अन्नधान्य दिलं.. एक दिवस फक्त त्याला साथ द्या ..शेतकरी जगला तर देश जगेल..8 तारखेचा भारत बंद उत्स्फूर्त यशस्वी करा असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी केले आहे.

Advt:-





Comments are closed

error: Content is protected !!