सांगवी:- संपूर्ण जगभरात कोरोना महामारीने थैमान घातल्याने मध्यमवर्ग नागरिक अडचणीत सापडला आहे. आजही हातांना काम नाही व काम नसल्याने पैसा नाही अशी दयणीय अवस्था त्यांची झाली आहे . पिंपरी चिंचवड मधील सांगवीतही गेल्या तीन महिन्यापासून राजू सावळे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून गरजू नागरिकांना मदतीचा हात म्हणून कार्य करत आहेत. त्याच्या प्रयत्नातून घरकाम करणाऱ्या महिला, गरजू मजुर, सलूनमधील कामगार, वृत्तपत्र वाटप व विक्री करणारे विक्रेते, भाजी विक्रेते, दिव्यांग , सुरक्षारक्षक अशा वेगवेगळी कामं करणारे मध्यमवर्गीय नागरिकांना मदत केली जात असून त्यांच्या संसाराला हातभार लावण्याचा प्रयत्न केला जात आहे.
त्याविचारातून रिक्षाचालकांच्या अडचणी लक्षात घेवून सांगवीतील सर्व रिक्षा स्टॅड वरील गरजू रिक्षा चालकांची माहिती घेवून त्वरित सर्व गरजू रिक्षा चालकांना जीवनावश्यक किराना वस्तूंचे वाटप करण्यात आले .
सांगवीत आपल्या सर्वाच्या मदतीस धावून येणारे रिक्षा चालकांच्या कुंटूबांना माझ्याकडून करण्यात आलेली मदत ही केवळ मदत नसून तर कर्तव्य समजून म्हणून मदतीचा हात पुढे केला असल्याचे राजू सावळे (पिं.चिं.शहर उपाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना) यांनी सांगितले.
बातमी साठी संपर्क:-
पत्रकार- सागर झगडे.
punetoday9news.com
9922557929
Comments are closed