एकूण ३ लाख १० हजार रु . चा मुद्देमाल जप्त.

चिंचवड ,दि.७(punetoday9news):- पिंपरी चिंचवड शहरातील चिंचवड परिसरात वाहने चोरणाऱ्या आरोपींना चिंचवड पोलीस स्टेशन ने अटक करुन १ रिक्षा , ७ मोटार सायकलीसह ६१ हजारांची तांब्याची भांडी हस्तगत केली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार चिंचवड पोलीस स्टेशन हद्दीत रात्रीच्या वेळी पेट्रोलिंग करताना चिंचवड पोलिस स्टेशन मधील पोलिस कर्मचारी शेलार व भदाणे यांना हाॅटेल रिव्हरव्युह जवळ संशयित रिक्षा दिसली अधिक चौकशी केल्यावर आरोपींनी तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला.  तीन पैकी दोन आरोपी इम्रान रहिम शेख (वय -१९ रा. वेताळनगर झोपडपटटी , चिंचवड ) अमर सुनिल वाघमारे (वय -१ ९ रा. मोरया हौ . सोसा . चिंचवड , पुणे) यांना अटक करण्यात आली.

त्या बाबतीत वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुधाकर काटे व सहाय्यक पोलिस निरीक्षक अभिजीत जाधव यांनी अधिक चौकशी केली असता आरोपींंनी मौज मजा करण्यासाठी व फिरण्यासाठी चिखली , भोसरी , चिंचवड , वाल्हेकरवाडी भागातुन मोटार सायकली चोरल्याची माहिती समोर आली . त्यांच्याकडून चोरी केलेल्या ७ दुचाकी, रिक्षा व   तांबे व ऍल्युमिनियम भांडी असा एकूण ३ लाख १० हजार रु . चा मुद्देमाल जप्त केला आहे .

अजून तपास चालू असून सदरची कामगीरी कृष्ण प्रकाश पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड , रामनाथ पोकळे अपर पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड , मंचक इप्पर पोलीस उप आयुक्त परि -१ पिंपरी चिंचवड , डॉ सागर कवडे सहा पोलीस आयुक्त पिंपरी विभाग , सुधाकर काटे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिंचवड पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शना खाली तपास पथकाचे सहा पोलीस निरीक्षक अभिजीत जाधव , पांडुरंग जगताप , स्वप्निल शेलार , रुषीकेश पाटील , विजयकुमार आखाडे , पंकज भदाणे , नितीन राठोड , गोविंद डोके , अमोल माने , सदानंद रुद्राक्षे यांनी केली आहे .

 

Comments are closed

error: Content is protected !!