पिंपरी,दि.९(punetoday9news):- शेतकरी आंदोलनाच्या समर्थनासाठी होत असलेल्या भारत बंदमध्ये पँथर रिपब्लिकन पार्टी (एस) ने सहभाग नोंदवला असून, केंद्र सरकारने शेतकरी विरोधी कायदे आणू नयेत, अशी मागणी केली आहे.
याबाबत पँथर रिपब्लिकन पार्टी (एस.) चे संस्थापक अध्यक्ष गौतम डोळस यांनी अखिल भारतीय किसान मंच समन्वय समितीला पाठिंब्याचे पत्र दिले. समितीच्या वतीने अजित अभ्यंकर यांनी पत्र स्वीकारले. यावेळी पँथर रिपब्लिकन पार्टी (एस) चे संस्थापक अध्यक्ष गौतम डोळस, पुणे जिल्हा अध्यक्ष किसन यादव, जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र मोहोळ, पुणे शहर युवा अध्यक्ष दत्तात्रय फाले आदी उपस्थित होते.
या पत्रात गौतम डोळस यांनी म्हटले आहे, केंद्र सरकार करीत असलेला शेतकरी विरोधी कायदा रोखावा, यासाठी आम्ही उत्स्फूर्तपणे पाठिंबा दर्शवला आहे. उद्योगपतींच्या हिताचे व शेतकऱ्यांवर अन्याय करणारे कायदे सरकारने रद्द करावेत, शेतमालाला बाजार हमी भावाचे संरक्षण मिळावे, बाजारभाव पडल्यास कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा माल सरकारने विकत घ्यावा आणि बँकेच्या माध्यमातून तात्काळ 50 ते 75 टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करावी, अशी तरतूद कायद्यात करण्याची मागणी करण्यात आली आहे.
Advt :-
Comments are closed