• जेजुरी एमआयडीसी, रांजणगाव, सारोळा, यवत, भुगाव, तळेगाव दाभाडे, अशा नवीन मार्ग गावांचा समावेश.

• विद्यार्थी, कामगार वर्ग प्रवासी सुखावणार. निर्णयाचे केले स्वागत. 

•  बातमी कळताच सोशल मिडिया वर आनंदाचे संदेश सर्वाधिक संख्येने होत आहेत फाॅरवर्ड. 

 

पुणे, दि.९(punetoday9news):- पुणे शहराच्या शेजारील गावातील प्रवासी वर्गाची बहुप्रतिक्षित मागणी अखेर पुर्ण होणार असून नवीन मार्ग समाविष्ट गावातील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ठरणार आहे कारण १२ डिसेंबर पासून पुणे महानगर परिवहन महामंडळा तर्फे नवे बारा प्रवासी मार्ग सुरू होणार आहेत.

त्यानुसार

 

जेजुरी एमआयडीसी, रांजणगाव, सारोळा, यवत, भुगाव, तळेगाव दाभाडे, अशा गावांचा समावेश या मार्गांवर एकूण ७० नवीन बस सोडण्यात येणार असून याचा मोठा फायदा विद्यार्थी, नोकरदार वर्ग व व्यवसायिकांना होणार आहे यापूर्वी या गावातील प्रवाशांना पुण्यात अथवा पिंपरी-चिंचवडमध्ये येताना खाजगी वाहनाने प्रवास करावा लागत होता मात्र या नवीन बस मार्गांचा समावेश झाल्याने त्यांचा प्रवास कमी खर्चात सुखकर होईल असे मत येथील नागरिकांनी व्यक्त केले आहे.

पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात राहणारे नागरिक ही   रांजणगाव, जेजुरी एमआयडीसी मधील भागात कामासाठी जात असतात त्यांच्यासाठी ही सुविधा महत्त्वाची ठरणार आहे.

नवीन मार्ग विस्तार  माहिती पीएमपीएमएल तर्फे परिपत्रक काढून देण्यात आली आहे.





Comments are closed

error: Content is protected !!