सांगवी : देश-विदेशातील मॅरेथॉन पूर्ण करण्याचा छंद असलेल्या सांगवी, पिंपरी-चिंचवड व पुणे येथील धावपटूंनी आतंरराष्ट्रीय कॉम्रेड्स मॅरेथॉन या दक्षिण आफ्रिकेतील स्पर्धेत सहभाग नोंदवला. कॉम्रेड्स मॅरेथॉन हि जगातील सगळ्यात जुनी आणि मोठी मॅरेथॉन असून साऊथ आफ्रिकन देशांमध्ये सन १९२१ मध्ये सुरु झाली होती. हि मॅरेथॉन नव्वद किलोमीटरची असून साऊथ आफ्रिकेतील डर्बन शहरापासुन ते पिटर्मॅरिट्ज़बर्ग या दोन शहरांमध्ये घेतली जाते. या वर्षी स्पर्धेत जगभरातील जवळपास ८६ देशातील ४० हजारांपेक्षा जास्त स्पर्धकांनी नाव नोंदविले होते. त्यापैकी ३१६ भारतीय स्पर्धकांनी नोंदणी केली होते. या वर्षी कोविड-१९ मुळे हि मॅरेथॉन रद्द करण्यात आली होती. मात्र कॉम्रेड मॅरेथॉन असोसिएशन (MCA ) यांनी हि मॅरेथॉन कॉम्रेड्स दिनी म्हणजेच १४ जून रविवारी रोजी (virtually) व्हर्चुअली घेतली जाईल असे जाहीर केले होते. दर वर्षी प्रमाणे या वेळी ९० किलोमीटरची अट न घालता ५, १०, २१, ४५ किंवा पूर्ण ९० किलोमीटर स्वतःच्या क्षमतेनुसार पळण्यास मुभा देण्यात आली होती. कोरोनाच्या परिस्थितीनुसार त्या त्या देशांतील अटी, नियमावलीचे पालन करून सहभागी होण्यासाठी सांगितले होते.
स्पर्धक सोसायटीच्या आवारात, घराच्या अंगणात, अशक्य असेल तर ट्रेडमिलवर सुद्धा पळू शकणार असल्याने ह्यामुळे जगभरातल्या असंख्य लोकांनी ऑनलाईन सहभाग नोंदवला होता. या ऑनलाईन नोंदणी करून जमा होणारी देणगी ही कोरोनाच्या परिस्थितीमध्ये लढवय्यासाठी वापरणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. पिंपरी-चिंचवड, पुण्यातून या कॉम्रेड्स मॅरेथॉनसाठी सुनील धाडवे, तुकाराम नाईक, राजेश सावंत, हिरालाल सावंत, अनिरुद्ध शिंदे,दीपक जगताप, मुकेश येवले, मनोज देशपांडे यांनी २१ किलोमीटरच्या स्पर्धेत भाग घेतला होता.
सारसबाग ते बाणेर आणि बाणेर ते शनिवारवाडा असा मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग नोंदवला.शनिवारवाडा, शिवाजीनगर, कृषी महाविद्यालय, ई-स्केवेअर, युनिव्हर्सिटी, बाणेर आणि बाणेरच्या के- फॅक्टरीला वळसा मारून ते परत मागे येत अभिमान सोसायटी पाषाण सर्कल, युनिव्हर्सिटी करत मॅरेथॉनची सांगता केली.
प्रतिक्रिया : नियमित व्यायाम व सराव व इच्छाशक्ती यामुळे लॉक डाउन च्या काळात व ते ही फिजिकल डिस्टनसिंग व इतर नियम पाळून एकवीस किलोमीटर २ तास ५३ मिनिटात अंतर पार केले. पुढच्या वर्षी या मॅरेथॉनला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत.
– सुनील धाडवे, कॉम्रेड्स मॅरेथॉन स्पर्धक .
Comments are closed