दिल्ली, दि (punetoday9news):- 2021 22 या आर्थिक वर्षामध्ये पगाराची नवीन रचना करण्यात आली आहे. खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या एक्झिक्यूटिव्हचा देखील पगार बदलणार आहे.
पुढील वर्षाच्या नवीन आर्थिक नियमानुसार एक एप्रिलपासून केंद्र सरकार नवीन वेतन श्रेणी नियम लागू करणार आहे. नवीन नियमानुसार सर्व प्रकारचे मिळणारे भत्ते हे पगाराच्या निम्म्याहून अधिक असू शकणार नाहीत.
सरकारच्या नव्या नियमानुसार एप्रिल 2021 पासून पगारातील बेसिक सॅलरी चा हिस्सा हा 50 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक ठेवावा लागणार आहे.
निवृत्तीनंतर मिळणाऱ्या ग्रॅच्युइटी ची रक्कम आता वाढणार असल्याने, खरा फायदा निवृत्तीनंतर तुम्हाला होऊ शकतो. ग्रॅच्युटीने ही बेसिक सॅलरी च्या हिशोबाने मोजली जाते. बेसिक सॅलरी वाढल्याने ग्रॅच्युटीने देखील वाढेल आणि यामुळे कर्मचारी आणि कंपनी या दोघांनाही पीएफ कॉन्ट्रीब्युशन वाढवावे लागणार आहे.
तुमची सेविंग वाढणार असून, त्याचा परिणाम इन हॅन्ड सॅलरी वर होणार आहे. इन हॅन्ड सॅलरी आता कमी होणार आहे. कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर फायदा झाला तरी कंपनीला मात्र वाढलेल्या ग्रॅच्युटीने नुकसान सोसावे लागेल.
Advt :-
7
Comments are closed