यावरून शहर बीजेपीत सर्व काही आलबेल नसल्याचे समोर .
पिंपरी, दि १० (punetoday9news):- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समिती बैठकीत वाकड प्रभागातील विकासकामांना मंजुरी देण्याच्या मुद्द्यावरून व बनावट कागदपत्रांच्या आधारे ठेके मिळविणाऱ्या ठेकेदारांबाबत खुलासा करण्याच्या मुद्यावर आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे यांच्या समर्थक नगरसेवकांमध्ये शाब्दिक चकमक पाहायला मिळाली . त्यामुळे सभेत मोठा गोंधळ उडाला.
बनावट कागदपत्रे घेऊन अनेक ठेकेदारांनी ठेके घेतले असून या प्रकरणाचा खुलासा आयुक्तांनी करावा अशी मागणी आमदार लक्ष्मण जगताप समर्थक नगरसेवकांनी केली . मात्र भाजपाच्याच स्थायी समितीचे अध्यक्ष संतोष लोंढे यांनी ही भाजपच्याच सदस्यांच्या या मागणीला उत्तर दिले नाही . यावरून हा अभूतपूर्व असा गोंधळ झाला.
हे ठेकेदार कोण? कोणाच्या सांगण्यावरून हे होत आहे ? आणि कोणत्या अधिकाऱ्यांची याला साथ आहे? याचा खुलासा आयुक्तांनी करावा आणि तसे आदेश अध्यक्ष लोंढे यांनी द्यावेत. अशी मागणी करत भाजपच्या जगताप समर्थकांनी भाजपच्याच अध्यक्षांना घेराव घातला. त्यामुळे यापुढे या प्रकरणावर पडदा पडणार कि हे प्रकरण नवीन वळण घेणार अशी चर्चा नागरिक करत आहेत .
Comments are closed