पिंपरी, ११ (punetoday9news):- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचा-यांना ७ व्या वेतन आयोगाच्या फरकाचे पहिले २ हप्ते जानेवारी २०२१ मध्ये देणार असल्याची माहिती महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी दिली.
यावेळी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये कार्यरत असलेल्या ७६२४ अधिकारी,कर्मचारी व सेवानिवृत्त झालेल्या २२०० अधिकारी,कर्मचा-यांना दि. १ जानेवारी २०१६ ते ३१ मे २०२० पर्यंतचा ७ वा वेतन आयोगाचा फरक एकूण ५ हप्तांमध्ये रोखीने अदा करण्यास मान्यता दिली होती. त्यानुसार माहे जुलै २०२० व जानेवारी २०२१ मध्ये देय असणारे फरकाचे २ हप्ते जानेवारी २०२१ मध्ये अदा करण्यास आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मान्यता दिली आहे. दोन्ही हप्ताची अंदाजे र.रु. १४० कोटी कार्यरत कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचारी यांना देय होणार असून त्यासाठी आवश्यक तरतूद अंदाजपत्रकामध्ये करण्यात आली आहे. उर्वरित ३ हप्ते प्रत्येक वर्षाच्या जानेवारी व जुलै महिन्यात देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
Advt:-
Comments are closed