मुंबई, दि. ११(punetoday9news):- शरद पवार यांच्या 80 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री, धनंजय मुंडे यांनी लोकाभिमुख योजना प्रभावी, परिणामाकारकपणे व अत्याधुनिक तंत्राच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ई बार्टी या अत्याधुनिक तंत्राने सज्ज असे मोबाईल ॲप लाँच करण्याची घोषणा केली असून दि. १२ डिसेंबर रोजी या ॲपचे लोकार्पण करण्यात येणार आहे.




सदर ‘ई-बार्टी’ अँप मुळे बार्टीमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या माहितीबरोबरच सदर योजनांचा लाभ घेण्याकरीता नावनोंदणी करणे शक्य होणार आहे. योजनेच्या लाभार्थ्यांबरोबरच या ॲपचा विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिकांनाही माहितीसाठी वापर करता येणार आहे. सदर ॲपमुळे सामाजिक न्याय व समतेच्या प्रस्थापनेकरीता कार्य केलेल्या थोर समाजसुधारकांचे समता विचार आणि दुर्मिळ साहित्य ऑनलाईन ई स्वरूपात उपलब्ध होणार आहेत. ई लायब्ररी, ई क्लासरूम, समताविचार, बार्टी बुलेटिन, रिसर्च, ई व्हॅलिडिटी, एम गव्हर्नन्स, पेमेंट गेटवे, तक्रार निवारण व मदत कक्ष इत्यादी ई टॅबच्या माध्यमातून नागरिकांना उत्तमोत्तम सुविधा या ॲपद्वारे मिळविता येणार आहे. विशेषत: या ॲप मधील पेमेंट गेटवे या सुविधेमुळे जातवैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी ऑनलाईन स्वरूपात सेवा शूल्क भरण्याची सुविधा मिळणार असल्यामुळे नागरिकांचा रांगेत उभे राहण्याचा त्रास कमी होणार आहे.

 

Comments are closed

error: Content is protected !!