जेजुरी दि,१२ (punetoday9news) :-  कोरोना च्या पार्श्वभूमीवर देहू , आळंदी या तीर्थक्षेत्रातील यात्रा रद्द करण्यात आल्या आहेत त्याच प्रमाणे आरोग्याच्या सुरक्षेच्या धर्तीवर अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडेरायाची सोमवती यात्रा ही रद्द करण्यात आली आहे. तसेच श्रींचा पालखी सोहळासुद्धा रद्द करण्यात आला आहे . त्याचबरोबर  जेजुरी शहरात भाविकांना प्रवेश नसून भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आणि कोरोना महामारीचा नायनाट करण्यासाठी वरिष्ठ पातळीवरील आदेशानुसार दि .१२ डिसेंबर ते १४ डिसेंबर या काळात  कलम १४४ नुसार जमावबंदी आदेश लागू करण्यात आला असल्याचे जेजुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी सांगितले आहे .




त्यामुळे राज्याच्या विविध भागातील भाविक भक्तांनी देवदर्शनासाठी जेजुरीत येऊ नये, प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही  करण्यात आले आहे.  पालखी सोहळा रद्द करण्यात आला असल्याने  भाविकांनी प्रशासनाच्या आदेशानुसार १२ ते १४ डिसेंबरच्या काळात जेजुरीत येणे टाळावे. जेजुरी शहरात  कोरोनाच्या रुग्णातही वाढ झाली  होती . त्यामुळे अनलॉक सुरु होताच मोठ्या प्रमाणात भाविकांचे प्रमाण पाहता नागरिकांनीही या निर्णयाचे स्वागत केले आहे .

Advt:-

Comments are closed

error: Content is protected !!