पिंपरी दि.१२(punetoday9news):-  पिंपरी चिंचवडला शहराला सांस्कृतिकदृष्ट्या प्रगल्भ करण्यासाठी तसेच शहरवासीयांसाठी उत्तम प्रतीचे आणि ८०० प्रेक्षकांची बैठक व्यवस्था असलेले मोठ्या क्षमतेचे नाट्यगृह उपलब्ध होण्याच्या  दृष्टीने प्राधिकरण येथे ग. दि. माडगुळकर नाट्यगृह उभारणेत येत आहे. या नाटयगृहाची आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी नुकतीच पाहणी केली आणि संबंधित अधिका-यांना लवकरात लवकर काम पूर्ण करण्याच्या सूचना केल्या.

सदर नाट्यगृहाची ठळक वैशिष्ट्ये :-
 आसनक्षमता

मुख्य नाट्यगृह – ८००

मिनी थिएटर – २२०

 वाहनतळ क्षमता

चारचाकी – ४००
दुचाकी – २६५

 कलाकारांसाठी १२ खोल्या
 कलादानस्थानिक कलाकरांच्या सरावासाठी   स्वतंत्र हॉल
 कॉन्फरन्स हॉल
 उपहारगृह
 रेस्टॉंरंट

लॉकडाऊनमुळे गेली काही महिने हे काम बंद होते. मात्र, अनलॉकनंतर पुन्हा जोमाने कामाला सुरुवात झाली आहे. सदर नाट्यगृहामध्ये २२० प्रेक्षक बैठक व्यवस्था असलेले एक लहान सभागृह, ११० बैठक व्यवस्था असलेले कॉन्फरन्स हॉल व कलादालन करण्याचे तसेच १२ निवासी खोल्या बांधण्याचे नियोजन आहे. नाट्यगृहात आधुनिक पध्दतीचे विद्युत व्यवस्था करणे, ध्वनी व्यवस्था करण्याचे नियोजन आहे. नागरिकांसाठी अँम्पीथिएटर, रेस्टॉरंटची सोय देखील करण्यात येणार आहे. नाट्यगृहाचे बांधकाम करताना जेष्ठ आणि अनुभवी कलाकारांनी सुचविल्याप्रमाणे आवश्यक त्या गोष्टींचा निजोयनामध्ये अंतर्भाव केलेला आहे.




पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या वतीने प्राधिरणातील पेठ क्रमांक २६ मधील पाच हजार चौरस मीटर भुखंडावर गदिमा नाट्यगृह उभारले जात आहे. सध्या फ्लोअरिंग, विद्युतविषयक कामे, इंटेरिअर अशी अंतर्गत कामे वेगाने सुरु आहेत. मुख्य नाट्यगृह, मिनी थिएटरचे बांधकाम झाले आहे, तसेच कॉन्फरन्स हॉल, आर्ट गॅलरी, कॅफेटेरिया, निवासी खोल्याचे व बाह्य सजावटीचे काम पुर्णत्वाकडे चालु आहे. सदर काम मार्च २०२१ पर्यंत पूर्ण होणार आहे.

 

Comments are closed

error: Content is protected !!