बारामती,दि.१३(punetoday9news):- शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त देशभरातील वरिष्ठ ,कनिष्ठ ते सामान्य कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या. मात्र कालच्या पवारांच्या वाढदिवशी सोशल मीडिया वर सर्वाधिक चर्चेत राहिले ते म्हणजे यवतमाळमधील शेतकरी संजय खंदारे-देशमुख. कारण ते शुभेच्छा देण्यासाठी चक्क पायी चालत ६०० किमी बारामतीत पोहोचले.
आपल्या नेत्यावर प्रेम व्यक्त करण्यासाठी प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते नेहमीच वेगवेगळ्या संकल्पना वापरत असतात. त्यासाठी वेळ, काळ किंवा अंतर पाहिले जात नाही . प्रामाणिक कार्यकर्ते हे आजच्या राजकारणात हाताच्या बोटावर मोजता येतील असेच पाहायला मिळतात. त्यापैकीच यवतमाळ जिल्ह्यातल्या जवळा इथले शेतकरी संजय खंदारे-देशमुख हे म्हणावे लागतील.
तब्बल २२ दिवसांचा प्रवास करत खंदारे देशमुख बारामतीत पोहोचले . या प्रवासात त्यांचे गावोगावी स्वागत करत काही नागरिकांनी जेवण व राहण्याची सोयही केल्याचे त्यांनी सांगितले . असे प्रामाणिक कार्यकर्ते कमवण्यासाठी नेत्यांना हि महान कार्य करावे लागते हे यावरून दिसून येते. कारण आजकाल सोशल मीडियावर ,चौकात मोठे फ्लेक्स लावून कार्यकर्ता स्वतः किती मोठा आहे हे दाखवत असतो, एवढच काय तर स्वार्थ प्रसंगी जागा तीच मात्र फ्लेक्स वरील पक्षाचा नेताच हे कार्यकर्ते बदलताना दिसतात . त्यामुळे अशा बेडूक उद्या मारणाऱ्या संधी साधू कार्यकर्त्यांना हि संजय खंदारे-देशमुख यांच्या सारख्या कार्यकर्त्याने आपल्या कार्यातून चपराक लगावली आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
Comments are closed