पुणे, दि. १४(punetoday9news):-विश्वविद्यालय अनुदान आयाेगचे अतिरिक्त सचिव डॉ. जी. श्रीनिवास यांचे नुकतेच ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले .
डॉ. जी. श्रीनिवास यांचेे वय ५५ होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. ते मुळचे हैदराबादचे असुन व सध्या पुण्यात राहत होते.
त्यांनी कार्यालयीन कामाबरोबरच सामाजिक सलोखा राखत अनेक गरजवंतांना मदत केली आहे. कार्यालयातही प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या संकटकाळी धावून जाणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती . त्यांच्या अचानक जाण्याने सहकारी, मित्र, परिवार यांनी शोक व्यक्त केला आहे. १२ डिसेंबर राेजी हैदराबाद येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
विश्वविद्यालय अनुदान आयाेग, पश्चीम विभागीय कार्यालय पुणे येथील सहकारी कर्मचारी यांच्या वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
Comments are closed