दिल्ली, दि. १४(punetoday9news):- भारताचा जगज्जेता बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद यांच्यावर आधारित बायोपिकची घोषणा करण्यात आली आहे. या बायोपिकचं दिग्दर्शन चित्रपट निर्माते आनंद एल राय करणार आहेत.
व्यापार चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी रविवारी ट्विट केले, विश्वनाथन आनंद यांच्या जीवनावर बायोपिक लवकरत प्रेक्षकांच्या भेटीसाठी येणार आहे.
▪️ ‘ए बायोपिक ऑन इंडियन चेस ग्रँडमास्टर विश्वनाथन’ या अनटायटल्ड बायोपिकचं दिग्दर्शन आनंद एल करणार आहेत. सुंदर एंटरटेनमेंट (महावीर जैन) आणि कलर यलो प्रॉडक्शन (आनंद एल. राय) हा बायोपिक निर्मिती करणार आहेत.
▪️ ‘तनू वेड्स मनू’ आणि ‘रांझणा’ या चित्रपटाचे दिग्दर्शन तसेच ‘मुक्काबाज’ या खेळाशी निगडित चित्रपटाची निर्मिती करणारे आनंद एल. राय यांच्याकडे या चरित्रपटाची मुख्य सूत्रे आहेत.
▪️ ‘ए बायोपिक ऑन इंडियन चेस ग्रँडमास्टर विश्वनाथन’ या अनटायटल्ड बायोपिकमध्ये कोणता अभिनेता जगज्जेत्या बुद्धिबळपटूची भूमिका साकारणार हे अद्याप कळलेले नाही.
पाच वेळा विश्वविजेता ठरलेल्या विश्वनाथन आनंदचा भारताचा पहिला ग्रँडमास्टर ते जगज्जेतेपदापर्यंतचा प्रवास, जगज्जेतेपदासाठीच्या थरारक लढती तसेच बुद्धिबळातील राजकारण हे या चित्रपटातील मुख्य मुद्दे असणार आहेत.
Comments are closed