पुणे,दि.१४(punetoday9news):- भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकत्ता, यांच्या असमान निधी योजनेंतर्गत जिल्हयातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या सर्वांगीण विकासासाठी अर्थसहाय्याच्या विविध योजना राबविण्यात येतात. त्यापैकी असमान निधी योजनांचा लाभ घेण्यासाठी विहित नमुन्यात प्रस्ताव सादर करणे आवश्यक असते. त्यानुसार सन २०२०-२१ साठी राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. त्या संदर्भातील नियम, अटी व अर्जाचा नमुना www.rrrlf.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली आहे.




इच्छुकांनी तो या संकेस्थळावरून उपलब्ध (Download) करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे .

 

Comments are closed

error: Content is protected !!