सांगवी, दि.१५(punetoday9news):- पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी परिसर महेश मंडळा तर्फे कै.चंपालालजी गुगळे यांच्या स्मरणार्थ २२ व्या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या नगरसेविका सौ . शारदा ताई सोनवणे यांनी स्वतः रक्तदान करून शिबिराचे उद्घाटन केले . या वेळी संदीप गुगळे, पुणे जिल्हा माहेश्वरी प्रगती मंडळाचे युवा अध्यक्ष कृष्णा राठी सतीश लोहिया, अभय जाजू , अभय करवा आदी उपस्थित होते.
सद्य स्थितीत शहरात रक्तपेढ्या मध्ये असलेली रक्ताची टंचाई व कोरोनामुळे रक्त संकलन करण्यात येणाऱ्या अडचणी च्या पार्शवभूमीवर या रक्तदान शिबिरात १५२ रक्तदात्यानी रक्तदानाचे पवित्र कार्य केले. रक्तसंकलनसाठी के इ एम हॉस्पिटलच्या रक्तपेढ़ीने सहकार्य केले.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी निलेश अटल ,विवेक झंवर , भूषण हरकुट, पंकज टावरी , मनोज अटल, गजानंद बिहाणी , तुषार माहेश्वरी , सचिन मंत्री यांनी सहकार्य केले.
Comments are closed