पुणे, दि. १५(punetoday9news):- शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या मामासाहेब मोहोळ महाविद्यालयातील व्यवसाय अभ्यासक्रम विभागाच्या वतीने वाहन प्रदुषण चाचणी हा उपक्रम आयोजित केला होता .
या उपक्रमाचे उदघाट्न संदिप कदम सहाय्यक आयुक्त, क्षेत्रिय कार्यालय ,पुणे महानगरपालिका यांनी केले .
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दिपक मानकर मा . उपमहापौर पुणे महानगरपालिका , व त्यांचे स्वीय सहाय्यक कानडे यांची उपस्तित होते.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळकृष्ण झावरे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले व वाहन चाचणी प्रमाणपत्र नागरिकांना प्रदान केले .
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी व्यवसाय अभ्यासक्रम विभाग प्रमुख प्रा. सुरेश मोरे ,प्रा . अरुण शिंदे ,प्रा . हेमंत सावंत यांनी मोलाचे सहकार्य केले . तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व स्टाफ यांची उपस्तिथी होती . या उपक्रमास नागरिकांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात होता.
व्यवसाय अभ्यासक्रम विभागातील प्रा.सुधाकर सुतार यांनी प्रास्ताविक केले. प्रा . अनिता तारू यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले . प्रा . राधिका इप्पकायल यांनी आभार प्रदर्शन केले .
Comments are closed