पिंपरी,दि.१८(punetoday9news):- पिंपरी येथे वाहतूक पोलीस महिलेने दुचाकीस्वार महिलांकडून लाच घेतल्याचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाल्यानंतर त्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचे निलंबन करत खुलासा मागवला होता .त्यावर लेखी खुलासा देताना चक्क त्या दुचाकीस्वार महिला ओळखीच्या असल्याचे सांगण्यात आले आहे .
त्यानुसर दोन दिवसांपूर्वी पिंपरीतील चौकात स्वाती सोन्नर त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कर्तव्य बजावत होत्या. तेव्हा, दुचाकीवरून आलेल्या दोन महिलांना त्यांनी अडवले . काही मिनिटांमध्ये त्या पैकी एक महिला दुचाकीवरून खाली उतरली. वाहतूक पोलीस स्वाती यांनी इतरांची नजर चुकवून पॅन्ट च्या पाठीमागील खिशात पैसे टाकण्यास त्या महिलेला सांगितले. दोन्ही महिला पैसे दिल्यानंतर काही वेळातच तातडीने निघून गेल्या. जवळच्याच एका इमारतीमधून हा प्रकार मोबाइल कॅमेरामध्ये कैद केला आणि त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला .
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर स्वाती यांना लेखी खुलासा देण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले होते. त्यावर स्वाती यांनी त्यांची चूक कबूल न करता त्या महिला ओळखीच्या असल्याचे सांगून पळवाट काढण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, त्यांनी केलेले गैरवर्तन आणि पिंपरी-चिंचवड पोलिसांची मलिन झालेली प्रतिमा यामुळे त्यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती पिंपरी वाहतूक पोलिसांनी दिली आहे.
Comments are closed