दिल्ली,दि.१९(punetoday9news):- शेतकरी आंदोलनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘‘कृषी सुधारणांविषयी कुणाला काही शंका, भीती असेल, तर नम्रपणे हात जोडून सांगतो की, “प्रत्येक मुद्दय़ावर चर्चेची आमची तयारी आहे”, असे आवाहन केले.
कृषी कायद्यांविषयी मोदी म्हणाले..
▪️ कृषी उत्पादनांचे सध्याचे किमान आधारभूत मूल्य सुरू राहील. किमान आधारभूत मूल्य पद्धती नष्ट होईल, हे धादांत खोटे आहे.
▪️ विरोधक ‘एमएसपी’बाबत शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहेत. तर राजकीय पक्ष, कृषितज्ज्ञ आणि प्रगतशील शेतकरी २०-२२ वर्षांपासून कायदे करण्याची मागणी करत होते.
▪️ सध्या गहू, ज्वारी, डाळी, मूग आदींना उच्च किमान आधारभूत मूल्य मिळत आहे. आधीच्या सरकारच्या ते जवळजवळ दुप्पट आहे, असे ते म्हणाले.
▪️ कृषी सुधारणांचे आश्वासन देणाऱ्या परंतु सत्तेवर येताच दुर्लक्ष करणाऱ्यांना शेतकऱ्यांनी जाब विचारावा.
▪️ नवे कृषी कायदे एका रात्रीत आलेले नाहीत, कंत्राटी शेती देशात अनेक दशकांपासून आहे. सध्याच्या कृषी सुधारणा २५-३० वर्षांपूर्वीच व्हायला हव्या होत्या, त्या आता विलंबाने होत आहेत.
▪️ गेल्या ६ महिन्यांत एकही बाजार समिती बंद झाली नाही, कारण सरकार त्यांच्या आधुनिकीकरणावर ५००० कोटी खर्च करत आहे.
विरोधकांना टोला– विरोधक सत्तेवर असताना त्यांना शेतकऱ्यांना उच्च एमएसपी द्यायचे नव्हते. विरोधकांना नव्या कृषी सुधारणांचे श्रेय आताच्या सरकारला द्यायचे नसल्यामुळेच ते शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहेत. मला श्रेय नको, पण ही दिशाभूल थांबवा, अशी विनंतीही पंतप्रधान मोदींनी केली आहे .
Comments are closed