पुणे,दि.१९(punetoday9news ):- पुण्यात औंध येथे वृद्धास मारहाण केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. आता या प्रकरणी सोमवारी पुणे जिल्हा सत्र न्यायालयात बचाव पक्षातून अर्ज केला जाणार आहे.

भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना १५ डिसेंबरला पुण्यात अटक करण्यात आली आहे. चतुःशृंगी पोलिस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली हर्षवर्धन जाधव  आणि घटनास्थळी सोबत असणाऱ्या एका महिलेविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. हर्षवर्धन जाधव आणि इशा झा या दोघांविरोधात अमन चड्डा यांनी फिर्याद दिली होती. आता न्यायालयाने या प्रकरणात हर्षवर्धन जाधव यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे.




तर दुसरीकडे हर्षवर्धन यांनी सासऱ्यांनी हे घडवून आणल्याचे आरोप केले आहेत त्यामुळे आता न्यायालयीन लढाईत हे प्रकरण  नेमके काय वळण घेते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे .

Comments are closed

error: Content is protected !!