माळशिरसचे भाजप आमदार राम सातपुते यांच्या लग्नाला हजारो पाहुण्यांची उपस्थिती.
पुणे, दि. २१(punetoday9news):- पुण्यातील शुभारंभ लॉन्समध्ये मोठ्या थाटामाटात हा विवाहसोहळा संपन्न झाला . मात्र सातपुतेंच्या लग्नात पाहुण्यांची प्रचंड गर्दी झाल्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह भाजपच्या दिग्गज नेत्यांनी लग्नाला हजेरी लावली होती.
लग्न सोहळ्यातील फोटोमध्ये अनेक पाहुणे आणि नेते मंडळींनी तोंडाला मास्क लावला नसल्याचे दिसून येते . मग सामान्य नागरिकांना लग्नासाठी पन्नास लोकांची मर्यादा ही राजकारण्यांसाठी नाही का? असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडणारच. आता यावर अधिकारी, प्रशासन खरोखरच कारवाई करणार का? की फक्त कारवाईचे कागदी घोडे नाचणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Comments are closed