मुंबई,दि.२१(punetoday9news):- ब्रिटनमध्ये कोरोना चा नवीन स्ट्रेन आढळल्याने जगभरात हाहाकार माजलेला आहे. यातून प्रादुर्भावाचा धोका 70% असल्याने ब्रिटनमध्ये लॉकडाऊन सुरू झालेला आहे.
भारताने सुद्धा ब्रिटनमधून येणाऱ्या विमानांना ‘नो एंट्री’ चा बोर्ड दाखवला आहे. अशोक चव्हाण यांनी केंद्राकडे केलेल्या मागणीनुसार आता 31 डिसेंबर पर्यंत ब्रिटनची विमाने भारतात येऊ शकणार नाहीत.
महाराष्ट्रात खबरदारीचा उपाय म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक बैठक बोलावली होती.
याच बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला की, आता महाराष्ट्रात उद्यापासून ते 5 जानेवारी पर्यंत महानगरपालिका क्षेत्रामध्ये रात्री 11- सकाळी 6 संचारबंदी असणार आहे.
भारताने कोरोनावर नियंत्रण मिळवले असले तरीदेखील अजूनही लस बाजारात उपलब्ध नाही. जानेवारीमध्ये लसीकरण सुरू होणार असल्याचे बोलले जात आहे.
मात्र, ब्रिटनमध्ये असे प्रकार घडत असल्याने कोरोनाचा हा दुसरा स्ट्रेन नवीन कुठला ताण जगावर निर्माण करतोय हे येणारा काळच ठरवेल. त्यामुळे खबरदारी घेणे हे एवढेच आपल्या हाती आहे.
Comments are closed