मुंबई, दि.२२(punetoday9news):- मुंबई पोलिसांनी मुंबई एयरपोर्ट जवळ असणाऱ्या ड्रॅगन फ्लाय क्लब येथे पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास धाड टाकली. रात्री उशिरापर्यंत क्लब सुरू ठेवल्यामुळे ही कारवाई करण्यात आली.




या धाडीमध्ये २७ ग्राहकांसह ७ कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

यात क्रिकेटपटू सुरेश रैना, हृतिक रोशन ची पूर्वाश्रमीची पत्नी सुजान खान, आणि गायक गुरु रंधावा यांची उपस्थिती असल्याने त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

रॅपर बादशाहने पळून जाण्याचा प्रयत्न केल्याची माहिती देखील मिळत आहे.

कालच मुख्यमंत्र्यांनी नाईट कर्फ्यू लागू केला. त्याची अंमलबजावणी आजपासून संपूर्ण महाराष्ट्रात होणार आहे.




कोरोना व्हायरस पार्श्वभूमीवर राज्य शासनाने हॉटेल सुरू करायला सशर्त परवानगी दिली होती.

मात्र, काही ठिकाणी नियम पायदळी तुडवून रात्री उशिरापर्यंत हॉटेल सुरू ठेवली जातात आणि तिथे कोरोना साठीच्या निर्बंधांचे पालनही केले जात नाही. याच अनुषंगाने ही धाड टाकण्यात आल्याचे बोलले जात आहे.

 

Comments are closed

error: Content is protected !!