शहरातील गुन्हेगारी साफ करण्याबरोबरच पोलिस खात्याची स्वच्छता करण्याचेही मोठे आव्हान.
पिंपरी,दि.२३(punetoday9news):- पिंपरी चिंचवड शहरातील पोलीसांची राज्यात प्रतिमा खराब होत असताना आता पिंपरी पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक आणि पोलिस उपनिरीक्षक यांना निलंबित करण्यात आले आहे.
तपासात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश अशा दोन अधिकाऱ्यांचे निलंबन केले आहे . याबाबतचा आदेश मंगळवारी ( दि . 22 ) रात्री उशिरा देण्यात आला आहे .
पिंपरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) राजेंद्र निकाळजे आणि पोलिस उपनिरीक्षक एस . एस.जाधव असे निलंबित करण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांची नावे आहेत .
मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी पोलीस ठाण्याचे राजेंद्र निकाळजे यांनी एका गंभीर गुन्ह्यात आरोपींवर लावलेले कलम कमी करणेबाबत न्यायलायकडे लेखी अहवाल दिला . त्यानुसार न्यायालयाने आरोपींची जामिनावर सुटका केली . तसेच पोलिस उपनिरीक्षक एस एस जाधव यांनी देखील आरोपींवरील दरोड्याचे कलम कमी करणेबाबत न्यायलायकडे लेखी अहवाल सादर केला . त्यानुसार न्यायालयाने या प्रकरणातही आरोपींना जामीन मंजूर केला .
पोलीस निरीक्षक निकाळजे आणि उपनिरीक्षक जाधव यांनी कलम कमी करून आरोपींना जामीन मिळण्यास मदत केली आहे . असा ठपका ठेऊन त्यांचे निलंबन करण्यात आले आहे . पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या आदेशामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे .
Comments are closed