सांगवी,दि.२३(punetoday9news):- पिंपरी चिंचवड शहरातील महिला वाहतूक पोलीस लाच प्रकरण ताजे असताना सांगवी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडल्याची घटना घडल्याने पिंपरी चिंचवड शहरातील कट्ट्यांवर पोलिसांची चर्चा चांगलीच जोर धरू लागली आहे. त्यातून सांगवी पोलिस ठाण्यात सर्व काही अलबेल नसल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.  




बंदोबस्त पुरविण्यासाठी 20 हजारांची लाच घेताना या पोलिसांला अटक करण्यात आली होती. शंकर एकनाथ जाधव ( वय 56 ) , असे रंगेहाथ पकडलेल्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे . याबाबत 55 वर्षीय व्यक्तीने एसीबीकडे तक्रार दिल्यानंतर सोमवारी 20 हजारांची लाच घेताना एसीबीने सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जाधवला रंगेहाथ पकडले . दरम्यान या प्रकरणात सांगवी पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याचा हात असल्याचे म्हटले जात होते . एसीबीने सुरुवातीला वरिष्ठ अधिकाऱ्यांची बराच वेळ चौकशी केली . त्यामध्ये वरिष्ठ अधिकारी दोषी नसून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दोषी असल्याचे आढळल्यानंतर याबाबत मंगळवारी (दि . 22 ) गुन्हा दखल करण्यात आला  .

मात्र सामान्य नागरिकांच्या मनात संरक्षणासाठी पोलिसांवर असलेला विश्वास अशा घटनांमुळे डळमळीत झाला आहे. एवढेच नसून काही एजंट सांगवी पोलिस ठाण्याबाहेर ठाण मांडून बसलेले असतात असेही नागरिकांचे म्हणणे आहे. वारंवार वेगवेगळ्या गैरप्रकारामुळे घडलेल्या घटनांची मालिका तयार होत असल्याने परिसरातील चर्चेचा केंद्रबिंदू पोलिस ठाणे बनू लागला आहे. त्यामुळे आता प्रतिमा सुधारण्याचे आव्हान पेलले जाणार की मागचेच दिवस पुढे येणार अशी चर्चाही चांगलीच रंगात आहे.




Comments are closed

error: Content is protected !!