पुणे,दि.२६(punetoday9news):- पुण्यातील गंगाधाम रस्त्यावर भरदिवसा झालेल्या ‘त्या’ खुनी हल्ल्यात आणखी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. एकाच वेळी दोन खून आणि तेही मुख्य रस्त्यावर थरारक रित्या झालेल्या खुनाने परिसरात तणावपूर्ण वातावरण तयार झाले होते. शुल्लक वादातून भरदिवसा डोक्यात वारकरून दोघांची हत्या झाल्याने पुण्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. शुक्रवारी सकाळी हा प्रकार घडला होता.
सलीम मेहबूब शेख (वय ४४) व तौफिक शेख (वय २७) अशी खून झालेल्या तरुणांची नावे आहेत. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी दोन जीव घेणाऱ्या अनिल कचरावत याला पकडले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सलीम व अनिल एकमेकांच्या ओळखीचे आहेत.
दररोज सलीम फुकटची दारू पीत असल्याचा आरोप करीत अनिलने त्याच्या डोक्यात इमारत बांधकामादरम्यान वापण्यात येणाऱ्या लोखंडी सळईने वार केला.
त्यामुळे गंभीररित्या जखमी झालेल्या सलीमचा जागीच मृत्यू झाला. त्याचवेळी सलीमला जेवणसाठी डबा घेउन आलेल्या तौफिकला अनिलने पाहिले. त्याचाही राग आल्यामुळे त्याचा देखील पाठलाग करत त्याच्यावर वार केले. श्रीजी लॉन्समोर अनिलने तौफिकच्या डोक्यात सळई घातली.
त्यामुळे तौफिक जागेवर खाली कोसळला होता. उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. मात्र, वाद सोडविण्यासाठी कोणीही पुढे आले नाही. त्यानंतर अनिल हातात सळई घेउन रस्त्याने बिनधास्तपणे फिरत होता. त्यानंतर एका वाहतूक कर्मचाऱ्याने त्याला पाहून ताब्यात घेतले.
Comments are closed