ऑस्ट्रेलिया, दि. २६(punetoday9news):- एडलेड येथे पराभवाचा सामना केल्यानंतर भारतीय संघाला आता ऑस्ट्रेलिया विरोधात बॉक्सिंग डे टेस्ट मध्ये आपली चमक दाखवण्याची संधी आहे.
बॉक्सिंग डे टेस्ट मध्ये सुरवातीलाच ऑस्ट्रेलियाला भारताने 3 धक्के दिले. बुमराह आणि आर आश्विन यांनी 3 बळी घेत ऑस्ट्रेलियाला आपली खेळी दाखवून दिली.
‘भारतीय टीम दबावात असेल, तर आम्हाला आनंद होईल. विराटच्या अनुपस्थितीमध्ये टीमचं नेतृत्व करणाऱ्या अजिंक्य रहाणेवर अतिरिक्त दबाव टाकण्याचा प्रयत्न आम्ही करू,’ असं ऑस्ट्रेलियन प्रशिक्षक जस्टिन लॅन्गर यांनी मॅच च्या सुरवातीला वक्तव्य केलं होतं.
अजिंक्य रहाणे सद्ध्या विराटच्या अनुपस्थितीत संघाचा कर्णधार म्हणून जबाबदारी पाहत आहे. जस्टिन यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या!
” ऑस्ट्रेलिया दबाव टाकण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यांनी तेच करावं. आम्ही संघाच्या कामगिरीवर लक्ष देऊ. लक्ष माझ्यावर नसेल. आम्ही संघ म्हणून खेळत आहोत. विराटने सुद्धा आम्हाला एकमेकांना मदत करत, मैदानात संयम बाळगत खेळायला सांगितले आहे.!” असे विधान त्याने दिले.
“भारतासाठी खेळणे आणि नेतृत्व करणे ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. माझं काम टीमला साथ देणे आहे, ते मी करेल! एडलेड मध्ये एक तासाच्या खराब खेळाने आम्हाला अपयश आले. आम्ही आत्मचिंतन केले आहे”, असे तो यावेळी म्हणाला.
Comments are closed