पुणे,दि.२६ (punetoday9news) :- पुण्यात  माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्ताने अटल संस्कृती गौरव पुरस्काराच्या वितरण सोहळ्यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मोठी घोषणा करत पुन्हा कोल्हापूरला परत जाण्याचा मानस व्यक्त केला आहे .

ते म्हणाले, ” पुणे सगळ्या अर्थाने प्रगतीचे शहर आहे. त्यामुळे प्रत्येकाला वाटते की, पुण्यामध्ये सेटल झाले पाहिजे पण देवेंद्रजी मी पुन्हा कोल्हापूरला जाणार आहे. हे माझ्या विरोधकांना सांगून टाकतो.”




चंद्रकांत पाटलांवर विरोधी नेते अनेकवेळा पुण्यातून निवडणुक लढवली म्हणून निशाणा साधत असतात तर सोशलमिडीयावर त्यांना पुण्याचा जावई म्हणूनही ट्रोल केले गेले आहे.

सुरक्षित मतदारसंघ म्हणून पाटलांनी पुण्यातून विधानसभा निवडणुक लढवली असे म्हणत पाटलांना नेहमी हिणवले जाते. मात्र पुण्यात सुरक्षित मतदारसंघ म्हणून नाही तर पक्षाने आदेश दिल्यामुळे आपण निवडणुक लढवली असल्याचेही  पाटील यांनी सांगितले होते.




यावेळी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस, खासदार गिरीश बापट महापौर मुरलीधर मोहोळ, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, यांच्यासह भाजपाचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

 

 

Comments are closed

error: Content is protected !!