एमपी दि.२८( punetoday9news):- मध्यप्रदेशातून जंगल सफारीचे वेड असणाऱ्या पर्यटकांसाठी आनंदाची बातमी आहे. आता मध्य प्रदेशातील व्याघ्र प्रकल्प असलेल्या बांधवगड येथे देशातील पहिल्या हॉट एअर बलून वाइल्ड लाइफ सफारीस सुरुवात झाली आहे. त्यामुळे पर्यटकांना आकाशातून या जंगलाचे विहंगम दृश्य पहायची संधी उपलब्ध झाली आहे.
देशातील पहिलाच प्रकल्प असून बांधवगडमध्ये याची सुरुवात मध्य प्रदेशचे वनमंत्री विजय शाह यांनी केली आहे. या एअर बलून सफारीला व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये प्रवेश नसणार आहे.
या सफारीच्या माध्यमातून पर्यटकांना वाघ, बिबट्या तसेच अन्य जंगली प्राण्यांचे आकाशातून दर्शन घेता येणार आहे.
भारतात अशा प्रकारची सुविधा ही पहिल्यांदाच उपलब्ध होत आहे. आफ्रिकेच्या जंगलात अशा प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत.
Comments are closed