पुणे, दि. 28(punetoday9news):- मौजे पेरणे येथील जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या अनुषंगाने पिंपरी-चिंचवड आयुक्तालय कार्यक्षेत्राचे हद्दीतुन शिक्रापुरकडे जाणाऱ्या तीन मार्गावरील वाहतुक दि. 1 जानेवारीस रात्री 12 वाजेपर्यत पर्यायी मार्गाने वाहतुक वळविण्यात आली असून व प्रवेश बंदी घोषित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत.
पुणे ग्रामीणमधील लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीत पेरणे येथे 1 जानेवारी 2021 रोजी जयस्तंभ कार्यक्रमाचे अनुषांगाने जयस्तंभास अभिवादन करण्यासाठी राज्यातून व परराज्यातून नागरीक येत असतात. यंदा सदर अभिवादनाचा कार्यक्रम कोविड – 19 च्या पार्श्वभूमीवर प्रतिकात्मक स्वरुपात व साध्या पदध्दतीने साजरा करण्याबाबत मार्गदर्शन सूचना देण्यात आलेल्या आहेत.
पिंपरी-चिंचवड आयुक्तालय कार्यक्षेत्राचे हद्दीतुन शिक्रापुरकडे जाणारे तीन मार्गावरील वाहतूक दि. 1 जानेवारी 2021 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत खाजगी व सार्वजनिक वाहतूकीच्या मार्गामध्ये बदल करण्यात येेणार आहे .
वाहतुक बंद करण्यात येणारे मार्ग-
चाकण,तळेगाव चौक- शेल पिंपळगांव-बहुळ-साबळेवाडी अशी दोन्ही बाजुकडील जाणारी-येणारी सर्व प्रकारची वाहतुक पुर्णपणे बंद करण्यात येईल .
आळंदी-शेलपिंपळगाव -बहुळ-साबळेवाडी अशी दोन्ही बाजुकडील येणारी सर्व प्रकारची वाहतुक पुर्णपणे बंद करण्यात येईल .
आळंदी-मरकळ-कोयाळी-शेलपिंपळगाव-बहुळ-साबळेवाडी दोन्ही बाजुकडील जाणारी-येणारी सर्व प्रकारची वाहतुक पुर्णपणे बंद करण्यात येईल.
पेरणे येथील जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाचे अनुषंगाने पिंपरी-चिंचवड आयुक्तालय कार्यक्षेत्राच्या हद्दीतुन शिक्रापुरकडे जाणारे तीन मार्गावारील वाहतुक दि. 1 जानेवारी 2021 रोजी रात्री 24.00 वाजेपर्यत पर्यायी मार्गाने वाहतुक वळविण्यात येणार असूून प्रवेश बंदी घोषित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत.
Comments are closed