दिल्ली,दि. २८(punetoday9news):- वाहन नोंदणी, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा फिटनेस प्रमाणपत्र अशा अनेक महत्त्वाच्या वाहन कागदपत्रांची गरज आपल्याला एखादे नवीन वाहन घेतल्यावर किंवा नेहमीच लागते. याबाबत केंद्र सरकारने सर्वसामान्यांना मोठा दिलासा पुन्हा एकदा दिला आहे.
आता कोणतीही व्यक्ती आपल्या वाहनाची वैधता १ फेब्रुवारी २०२० रोजी संपली असेल, तरीदेखील ती कागदपत्रे ३१ मार्च २०२१ पर्यंत वैध म्हणून वापरू शकते.
लॉकडाउनच्या काळामध्ये अनेकांचे ड्रायव्हिंग लायसन्स, आरसी किंवा परमिटची व्हॅलिडीटी संपलेली आहे. या काळात अनेकांना हे नूतनीकरण करून घेण्याची सोय नव्हती.
अशा लोकांसाठी ही वाढलेली मुदत चौथ्या वेळी आहे. याआधी तीन वेळा सरकारने वैधता वाढवली होती. कोरोना पार्श्वभूमीवर ऑनलाइन द्वारे अर्ज केल्यानंतर काही महिन्यांनंतरची तारीख मिळते. ही बाब लक्षात घेऊन आणखी तीन महिने ही वैधता वाढवून सरकारने नवी मुदत सामान्य माणसांना दिली आहे.
सुरक्षित अंतर ठेवून हे सगळे कारभार व्हावेत यासाठी केंद्र सरकारचा हा महत्त्वाचा निर्णय समोर येत आहे.
केंद्र सरकारच्या नव्या नियमानुसार जर ड्रायव्हिंग लायसन्स नसेल तर ५ हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. तुमच्याकडे लायसन्स असून ते वैध नसेल तरीदेखील, तुम्ही लायसन्स विना गाडी चालवत आहात असे मानून तुम्हाला तो दंड भरावा लागू शकतो.
Comments are closed