रहाणेची 7 वर्षांनी धोनीच्या कामगिरीशी बरोबरी

Ind vs Aus,दि.२९(punetoday9news):- मेलबर्न कसोटी सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियावर 8 गडी राखून मात करत 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. भारतीय गोलंदाजांनी दोन्ही डावांत भेदक मारा करत ऑस्ट्रेलियाचा डाव झटपट गुंडाळला.




भारतीय संघाची दुसऱ्या डावातही खराब सुरुवात झाली. कर्णधार अजिंक्य रहाणेने शतकी खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

पहिल्या डावात अजिंक्यने 112 तर दुसऱ्या डावात नाबाद 27 धावांची खेळी केली. दुसऱ्या डावात 70 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना रहाणेने विजयी फटका खेळत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

तब्बल 7 वर्षांनी भारतीय कर्णधाराने कसोटी क्रिकेटमध्ये विजयी फटका खेळण्याचा योगायोग जुळून आला आहे. 2013 साली कर्णधार धोनीने दिल्ली कसोटीत विजयी फटका खेळला होता.




सलामीवीर मयांक अग्रवाल दुसऱ्या डावातही अवघ्या 5 धावा काढून मिचेल स्टार्कच्या तर चेतेश्वर पुजारा 3 धावा काढून कमिन्सच्या गोलंदाजीवर माघारी परतला. यानंतर मैदानावर आलेल्या अजिंक्य रहाणे-शुभमन गिलने काही सुरेख फटके लगावत अधिक पडझड न होऊ देता संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

Comments are closed

error: Content is protected !!