अहमदनगर,दि.३०(punetoday9news):- नववर्षाच्या मुहूर्तावर मंदिर भक्तांच्यासाठी उघडे ठेवण्याची मागणी साई भक्तांकडून करण्यात येत होती. त्यानुसार राज्य सरकारच्या नियमांचे पालन करत ३१ डिसेंबरच्या रात्रीही मंदिर सुरु ठेवण्याचा निर्णय साई संस्थानकडून घेण्यात आला आहे. साई संस्थानच्या या निर्णयामुळे नववर्षाच्या सुरुवातीला भाविकांना साईंचे दर्शन घेता येणार आहे.




३१ डिसेंबरला रात्री १२ वा. साईंच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मर्यादित भाविकांनाच दर्शनाचा लाभ घेता येणार आहे. त्यासाठी प्रवेशद्वारावर बॅरिकेटिंग करण्यात आले आहे. तर मंदिरात प्रवेश घेऊ न शकणाऱ्या भाविकांसाठी खास एलईडीचीही व्यवस्था करण्यात आली आहे. अनलॉकनंतर राज्यातील मंदिरे सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. तेव्हापासून आतापर्यंत जवळपास साडे तीन लाख भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला आहे. आता नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात मोठा पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.

Comments are closed

error: Content is protected !!