पिंपरी,दि.३०(punetoday9news):- कोविड-१९ च्या संकटकाळात पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि शहर पोलिस दलाने उत्कृष्टपणे आपली जबाबदारी पार पाडली. तसेच कार्तिक मासामध्ये वारकरी मंडळांच्या वतीने आयोजिलेल्या विविध उपक्रमांना महापालिका आणि पोलीस दलाने विशेष सहकार्य केले.
यामध्ये पिंपरी चिंचवड शहराचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश आणि महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी प्रमुख भूमिका बजावली. त्यांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम आज अखिल भारतीय वारकरी मंडळ आणि महाराष्ट्र वारकरी महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते मानपत्र, शाल,पगडी, संत तुकाराम महाराज गाथा व ज्ञानेश्वरी ग्रंथ, वीणा, मृदुंग, टाळ-चिपळ्या देऊन हा सत्कार करण्यात आला.
यावेळी स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, ब प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर आदींसह वारकरी उपस्थित होते.
Comments are closed