पिंपरी,दि.३१ (punetoday9news):- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरातील शाळा महाविद्यालये बंद ठेवण्यात आले होते त्यानंतर ग्रामीण भाग व कोरोना रुग्णांची संख्या कमी असलेल्या ठिकाणी शाळा व महाविद्यालय चालू करण्यात आली आहेत मात्र शहरातील शाळांबाबत निर्णय हा पुढे ढकलत पुणे व पिंपरी चिंचवड मधील शाळा बंदच ठेवण्यात आल्या होत्या . त्यामुळे आता पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रामध्ये इयत्ता ९ वी ते १२ वी चे वर्ग दिनांक ४ जानेवारी २०२० पासुन सुरु करणेबाबत सुधारित आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज शहरातील शाळांना दिले आहेत.
शाळा सुरु करण्यापुर्वी व शाळा सुरु झाल्यानंतर आरोग्य , स्वच्छता व इतर सुरक्षाविषयक उपाययोजनांबाबतच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करण्याचे आदेश देखील यामध्ये समावेश आहेत.तसेच शाळा महाविद्यालयामधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी होणे आवश्यक आहे. कोणत्याही प्रकारची लक्षणे नसलेल्या कर्मचाऱ्यांनाच कामावर हजर करुन घेण्याचे सूचित केलेले आहे . प्रत्यक्ष शाळा सुरु करण्याकरीता शाळेतील १०० % शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोविड टेस्ट होणे बंधनकारक आहे . तसेच विद्यार्थ्यांच्या पालकांचे संमतीपत्र भरुन घेणे आवश्यक आहे . शाळा सुरु करण्यापूर्वी शाळा निर्जतुफीकरण ( सॅनिटायझेशन ) , तापमान मोजणीसाठीची गन , डिजिटल थर्मामीटर , हात धुण्याची व्यवस्था करण्यात यावी असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
तसेच महानगरपालिका क्षेत्रातील सर्व प्रकारच्या शाळेत इयत्ता ९ वी ते इयत्ता १२ वी चे वर्ग दिनांक ०४ जानेवारी २०२१ पासून शाळा सुरु करणेबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्यामार्फत निर्गमित करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचना व अटींचे पालन करणे बंधनकारक राहील .
या सर्व गोष्टी अवलंब करून आता पिंपरी चिंचवड शहरातील शाळा आणि महाविद्यालय वर्ग सुरू करण्यात येणार आहेत.
Comments are closed